Homeताज्या बातम्यादेश

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः नागालँड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसने 7 जागा मिळवत आपले वर्चस्व दाखवून दिले होते. मात्र नागालँडमध्य

शेतकऱ्यांचे पुतळे उभारून श्रमशक्तीचा राज्यात सन्मान करूया – मंत्री सुनील केदार
पवार-शाह यांच्या कथित भेटीनंतरही महाविकास आघाडी मजबूत
तक्रारदार महिलेकडून अधिकाऱ्याने करून घेतला बॉडी मसाज

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः नागालँड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसने 7 जागा मिळवत आपले वर्चस्व दाखवून दिले होते. मात्र नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाजपविरोधकांची मोट बांधण्यांच्या शंकेवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहिमाममध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 7 जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला. याबाबत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात राष्ट्रवादीने म्हटले की, 4 मार्चला कोहिमा येथे झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते, उपनेते, प्रमुख प्रतोद आणि प्रवक्ते यांची निवड करण्यात आली. तसेच सरकारला पाठिंबा द्यायचा की विरोधी पक्षात राहून काम करायचं यावरही चर्चा झाली. यात नवनियुक्त आमदारांनी आणि स्थानिक पक्षनेत्यांनी राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्री एन. रिओ यांच्या नेतृत्वातील एनडीपीपी सरकारचा भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS