छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - गेल्या 20 - 25 वर्षांपासून मंत्री अब्दुल सत्तार सोयगाव तालुक्यातील वाडी, तांड्यात पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – गेल्या 20 – 25 वर्षांपासून मंत्री अब्दुल सत्तार सोयगाव तालुक्यातील वाडी, तांड्यात पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या होळीच्या कार्यक्रमात सहभागी होतात. याहीवर्षी अब्दुल सत्तार यांनी येथील होळी निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होऊन तसेच सोयगाव येथील मित्र जनांच्या घरी सदिच्छा भेटी देऊन होळी – रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्री अब्दुल सत्तार दरवर्षी होळी सणात सहभागी होत असल्याने येथील आबालवृद्ध देखील त्यांची आवर्जून वाट पाहतात. विविध गावात मंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन होताच या भागातील नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला. काही ठिकाणी औक्षण करून तर बऱ्याच ठिकाणी वाजत गाजत मंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत करण्यात आले. सोयगाव तालुक्यातील वाडी, तांड्यात बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे येथील होळी सणाला पारंपरिक व प्राचीन प्रथा आहे. होळी निमित्त हातात हलगी घेवून पारंपरिक बंजारा गीतांवर पुरुष तसेच महिला भगिनींकडून नृत्य सादर केले जाते. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी होती.
COMMENTS