Homeताज्या बातम्यादेश

मध्य प्रदेश सरकारची बहिणींना भेट, लाडली बहना योजना सुरू

मध्य प्रदेश प्रतिनिधी- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. त्यांनी रविवारपासून महिलांसाठी 'मुख्

तक्रारीची दखल न घेतल्याने महावितरणला आर्थिक दंड
पारनेरमध्ये त्रिशंकू स्थिती, राष्ट्रवादी व सेनेला समान संधी
गोदावरीत उडी घेऊन महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या | LOKNews24

मध्य प्रदेश प्रतिनिधी- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. त्यांनी रविवारपासून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना लागू केली आहे. ही योजना प्रामुख्याने विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सरकार या महिलांना दरमहा एक हजार रुपये देणार आहे. ग्रामपंचायत, प्रभाग व अंगणवाडी केंद्रात शिबिरे उभारून त्याचे अर्ज भरण्यात येणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील हजारो महिलांना आपले जीवन चालविण्यास मदत होणार आहे. गावपातळीपर्यंत या योजनेचे कौतुक होत आहे. ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजनेबाबत सरकार म्हणते की, मध्य प्रदेशात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होत आहे. लाडली लक्ष्मी योजनेनंतर लाडली बेहना योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये राज्य सरकार दर महिन्याच्या १० तारखेला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करणार आहे. विशेषत: विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता बहिणींचा विचार करून ही योजना लागू करण्यात आली आहे. या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. या योजनेच्या मदतीने आर्थिक बळ, समृद्धी आणि सक्षमीकरणासह महिला मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारू शकतील. ग्रामपंचायत, प्रभाग व अंगणवाडी केंद्रात शिबिरे उभारून या योजनेचे अर्ज भरण्यात येणार आहेत

COMMENTS