हवेतील ऑक्सिजन मिळवण्याचे  प्रयत्न सुरू : रोहित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हवेतील ऑक्सिजन मिळवण्याचे प्रयत्न सुरू : रोहित पवार

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची बाराशे टन क्षमता आहे आणि आता आपण बाराशेचा पूर्ण वापर करत चाललोय.

गौतम बँकेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश ः आ.आशुतोष काळे
मोठी बातमी ! पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
*तहसिल कार्यालयात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या l पहा LokNews24*

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची बाराशे टन क्षमता आहे आणि आता आपण बाराशेचा पूर्ण वापर करत चाललोय. आता फक्त हॉस्पिटलला ऑक्सिजन चालले आहे. देशात साडेसात हजार टन कॅपॅसिटी आहे, मात्र बाहेर काय चालले आहे हे सांगता येणार नाही. पण महाराष्ट्रात तरी काही प्रमाणात हवेतला ऑक्सिजन कन्वर्ट करून सिलेंडरमध्ये भरण्याची सोय केलेली आहे. पुढच्या तीन दिवसात तो विषय होईल, असे सुतोवाच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी येथे केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले असताना पवार पत्रकारांशी बोलत होते. आता मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा विषय पुढे आलेला आहे. इंजेक्शनपेक्षा आता ऑक्सिजन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याचे नियोजन राज्य पातळीवरून सर्वत्र सुरू आहे. यातून मार्ग निघेल, असा विश्‍वास व्यक्त करून ते म्हणाले, सगळे काम करतात पण कोठेना कोठे तरी आपण कमी पडतो. रुग्णाचे आकडे मोठे झाले पण तरीसुद्धा आपण बाहेर निघू, असा विश्‍वास आता वाटत आहे, असे ते म्हणाले. देशामध्ये कोरोनाची परिस्थिती अधिक तीव्र होत चालली आहे व केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही, असे विचारल्यावर ते म्हणाले, ते कुठल्या पार्टीचे बघण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान आहेत. आता कठीण परिस्थिती देशामधे आहे, महाराष्ट्रात रुग्ण वाढ होत आहे पण महाराष्ट्राबरोबरच यूपीमध्ये 22018 वर आकडा गेला. तिथे बेड कमी आहे महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कोण, कुठला, कुठल्या पार्टीचा हे बघण्यापेक्षा आज सगळ्यांनी माणुसकी म्हणून एकत्रित येणे व या विषयावर काम करावे, असे माझे व्यक्तिगत मत आहे, असेही ते म्हणाले.

आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे की, सध्याची जी परिस्थिती आहे व हा जो विषाणू आता नवीन पद्धतीने आला आहे. त्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि आपली प्रतिकारशक्तीही कमी होते, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊन आता अधिक कडक करावे लागणार आहे. नगर जिल्ह्यातच नाही, तर राज्यात अशी परिस्थिती होऊ लागलेली आहे. जनतेने विनाकारण घराबाहेर पडता कामा नये. अत्यावश्यक असेल तरच त्यांनी बाहेर पडले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

COMMENTS