Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा

आंबा, गहू, हरभरासह फळबागांचे मोठे नुकसान

नाशिक-धुळे/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्यामुळे शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशि

अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
सांगली बँकेस 18 जागांसाठी 85.31 टक्के मतदान
महाबळेश्‍वरवाडी येथे वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

नाशिक-धुळे/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्यामुळे शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, धुळे आणि बुलडाण्यासह विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या पावसामुळं काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पिकांवर रोग पडण्याची शक्यता देखील आहे. तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे.  
नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मालेगाव, सटाणा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. तर कळवणच्या अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभर्‍यासह आंबा मोहराला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या अवकाळी पावसामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, पपई यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार धुळे जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाटासह वादळी वारा यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मायबाप सरकारने या नुकसानीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद परिसरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्याच्या पूर्वेच्या विक्रमगड, वाड्यासह काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या. शेतकर्‍यांची रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तुर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकर्‍यांची तारंबळ उडाली. तसेच वीटभट्टी मालकांचीही दाणादाण उडाली आहे. आंबा बगायतदारांचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. आंबाच्या झाडांना मोहर आला असून काही भागात सुपारीच्या आकाराचे आंबे लागले आहेत. जोरदार पावसाच्या मार्‍यानं हे छोट्या आकाराचे आंबे झाडावरुन गळून पडले आहेत. तर काही भागातील मोहरही गळून गेला आहे.

COMMENTS