Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेत कोण मांडणार अर्थसंकल्प ?

राज्यमंत्री नसल्याने शिंदे-फडणवीसांसमोर मोठा पेच

मुंबई/प्रतिनिधी ःराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झाले आहे. 9 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. विधानसभेत अर्थमंत्री तर विधानपरिषदेत अर्

जायकवाडीला पाणी सोडण्याचा घातक निर्णय शासनाने घेऊ नये ः शिंदे
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Video)
सावित्रीमाईं’चा महाराष्ट्र !

मुंबई/प्रतिनिधी ःराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झाले आहे. 9 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. विधानसभेत अर्थमंत्री तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. मात्र अर्थ राज्यमंत्री नसल्यामुळे विधानपरिषदेत अर्थसंकल्प कोण मांडणार असा पेच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आहे.
या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात ते महाराष्ट्राला काय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार. पण असे असले तरी विधान परिषदेत हा अर्थसंकल्प कोण सादर करणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही. आतापर्यंतच्या संसदीय प्रथेप्रमाणे राज्याचा अर्थसंकल्प हे अर्थमंत्री विधानसभेत सादर करतात तर अर्थ राज्यमंत्री हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतात. पण, आता ही परंपरा मोडीत निघणार आहे. कारण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये फक्त कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात फक्त 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. हे 18 ही मंत्री कॅबिनेट दर्जाचे आहेत. यात एकाही राज्यमंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. सरकारला सत्तेत येऊन 8 महिने झाले. पण, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात आता अर्थ राज्यमंत्रीच नाहीत. त्यामळे विधान परिषदेत अर्थसंकल्प नेमका कोण सादर करणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. याबाबत पत्रकारांनी ज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कोणतेही ठोस उत्तर देता आलं नाही. जेव्हा हा प्रश्‍न शिंदेंना विचारण्यात आला तेव्हा शिंदेंनी हा प्रश्‍न फडणवीसांकडे टोलावला. तेव्हा फडणवीसांनी देखील फारसे काही उत्तर न देता.. विधान परिषदेत कोणाला तरी नॉमिनेट करू एवढेच उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेली. आता शिंदे सरकारमध्ये फक्त 18 कॅबिनेट मंत्री आहेत. अनेकांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. आता राज्यमंत्री नेमायचे म्हटल्यावर या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकावर ही जबाबदारी सोपवणार की आणखी दुसर्‍या कोणाला संधी देणार? हे बघणे महत्वाचे आहे. अर्थसंकल्पाच्या वाचनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा सवाल उपस्थित झाला आहे. सरकार स्थापन होऊन 8 महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी केलेले अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्यातील काही जणांना पहिल्या विस्तारातच मंत्रिपद मिळाले आहे. मात्र, अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. अशावेळी शिंदे आणि फडणवीस हे मंत्रिमंडळाचा नेमका विस्तार कधी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS