कोपरगाव तहसीलदार यांच्यावरील खोटा गुन्हा रद्द करावा : महसूल विभागाचे लाक्षणिक उपोषण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तहसीलदार यांच्यावरील खोटा गुन्हा रद्द करावा : महसूल विभागाचे लाक्षणिक उपोषण

कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर विनय भंगाचा खोटा गुन्हा दाखल झालेला असून तो मागे घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करण्यासा

रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पदरमोड करून आमदार काळेंनी ठेवली उजनी चारी योजना
मुळाच्या पाणी वापर संस्थांच्या निवडणुका होणार लवकरच

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर विनय भंगाचा खोटा गुन्हा दाखल झालेला असून तो मागे घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ कोपरगाव,मंडळाधिकारी संघटना ,कोतवाल संघटना   आदींनी उपविभागीय अधिकारी शिर्डी यांना निवेदन देत दिनांक २८/२/२०२३ रोजी लाक्षणीक काम बंद आंदोलन करणार असल्याचे म्हटले  आहे.

   तलाठी संघटनेच्या वतीने प्रांतधिकारी यांना दिलेल्या   निवेदनात  म्हटले आहे की आम्ही सर्व तलाठी संघटना व मंडलाधिकारी निवेदन देतो की दिनांक २५/०२/२०२३ रोजी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन कोपरगाव येथे पहाटे ४ वाजता ग्रामीण पोलीस स्टेशन कोपरगाव पहाटे ४.३० वाजता व ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे पहाटे ५ दरम्यान अचानक भेट दिली असता ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथील अधिकारी कर्मचारी यांना अपशब्द वापरले तसेच भेटीदरम्यान महिला कर्मचारी यांना अपशब्द वापरले विनयभंग केला असे  खोटे आरोप करून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९९/ २०२३ भादवी कलम ३५४, ५०४, ५०६ अन्वये खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा मागे घेऊन संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी  लाक्षणीक कामबंद आंदोलन करत असल्याचे उपविभागीय अधिकारी शिर्डी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा तलाठी संघटना संघटक उत्तर विभाग धनंजय प-हाड, जिल्हा तलाठी संघटना उपाध्यक्ष एस.पी.लहाने,

 वाय. बी. तांगडे ,जी .एम. गरकल ,एन .आर .जावळे, एच .व्ही .माळी, एस .बी .चाकणे ,डी.सी. वडीतके, बी.एफ. कोळगे ,जी.डी. वाघ ,प्रसाद  कदम ,पी.डी.पवार, बी.बी. गोसावी, के.एम,गटकळ, ठेंगडे व्ही.आर. पी.एस ,डहाके, जे.एल.पठाण,व्ही.व्ही.कोल्हे,सौ. सय्यद एस, जे.,एस.सी. थोरात ,ए.एल .सिरसाठ,’  श्रीमती निर्मळ ए.एस ,श्रीमती विधाते डी.बी., श्री एस बी गायके. आदी उपस्थित होते. दरम्यान तहसिलदार विजय बोरुडे यांना सोमवार दिनांक २७/०२/२०२३ रोजी जिल्हा व सञ न्यायालय यांनी ६ मार्च पर्यत अंतरीम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या वतीने अॕड.जयंत जोशी यांनी युक्तीवाद केला.

COMMENTS