देव तारी त्याला कोण मारी’ काहीसं असंच घडलंय प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्याबरोबर. अभिनेता विशाल कृष्ण रेड्डी नुकताच

देव तारी त्याला कोण मारी’ काहीसं असंच घडलंय प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्याबरोबर. अभिनेता विशाल कृष्ण रेड्डी नुकताच एका मोठ्या अपघातातून मरता मरता वाचला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीच्या सुपरस्टारने त्याचा आगामी चित्रपट ‘मार्क एंटनी’च्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर करत स्वतःबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगाची माहिती दिली. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. विशाल कृष्ण रेड्डीने त्याच्या ट्विटर हँडलवर ‘मार्क एंटनी’ चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याबरोबर मोठा अपघात होता होता राहिला आहे. सुदैवाने अभिनेता यातून वाचला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विशालने लिहिलं, “काही सेकंद आणि काही इंचाने देवाने माझा जीव वाचवला. देवाचे खूप खूप आभार. मी या घटनेनंतर स्तब्ध झालो आहे आणि आता पुन्हा स्वतःच्या पायांवर शूटिंग सेटवर परतलो आहे.”
COMMENTS