Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्या

शेतकऱ्यांवर ओढावलं विचित्र संकट
रिक्षा व मोटरसायकल चोरणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात I LOKNews24
संगमनेरच्या जांबुत येथे महिला सरपंचाना गावकऱ्यांची पसंती

पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देवीसिंह शेखावत यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अमरावतीच्या महापौरपदापासून केली होती. त्यानंतर ते अमरावतीमधूनच 1985 साली आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान आहे. मुंबई विद्यापीठाकडून त्यांना 1972 रोजी पीएचडीची पदवी प्रदान करण्यात आली होती. याशिवाय ते विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशन संचलित महाविद्यालयाचे प्राचार्य देखील होते. सात जुलै 1985 ला त्यांचा विवाह प्रतिभा पाटील यांच्याशी झाला होता. 

COMMENTS