Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसब्यात साडेपाच लाखांची रोकड जप्त

भरारी पथकाची कारवाई

पुणे : पोटनिवडणूक मतदान तोंडावर आले असल्याने कारवाईला वेग आला आहे. कसब्यात भरारी पथकाकडून साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय

शासकीय योजनांचा जत्रा कार्यक्रम घरोघर पोहचवा
देशभरात कोरोनाचे 305 नवे रूग्ण
भावना गवळी यांच्या संस्थावर ‘ईडी’चे छापे; 100 कोटी रुपयांची लूट केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

पुणे : पोटनिवडणूक मतदान तोंडावर आले असल्याने कारवाईला वेग आला आहे. कसब्यात भरारी पथकाकडून साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय अमली पदार्थ, अवैध मद्य जप्तीच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे. चिंचवड मतदारसंघात आतापर्यंत 43 लाख रुपये, तर कसब्यात यापूर्वी पाच लाख तीन हजार 500, तर मंगळवारी साडेपाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख 53 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही साडेपाच लाख रुपयांची रोकड स्वारगेट येथे भरारी पथकाने चारचाकीची तपासणी करून रोकड जप्त केली.
 संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस करत आहेत. चिंचवडमध्ये 7336.16 लिटर, तर कसब्यात 313.180 लिटर मद्य जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अनुक्रमे चार लाख 97 हजार 625 आणि 20 हजार 650 रुपये आहे. चिंचवडमध्ये 94 हजार 750 रुपये किंमतीचे 3.584 ग्रॅम, तर पाच लाख रुपयांचे 25 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, कसब्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सेंट्रल आर्मडड् पोलीस फोर्स – सीएपीएफ) पाच तुकड्या, पोलीस 1500, तर चिंचवडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स – सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स – सीआयएसएफ) आणि आयटीबीपीची प्रत्येकी एक तुकडी तैनात असेल. शीघ्र कृती दलाच्या (आरपीएफ) दोन तुकड्या, पोलीस 836, तर गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) 169 कर्मचारी तैनात असणार आहेत. कसब्यात नऊ, तर चिंचवडमध्ये 13 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. कसब्यातील 27, तर चिंचवडमधील 51 मतदान केंद्रांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चिंचवडमध्ये 12 भरारी पथके, अवैध रोकड तपासणारी सात पथके, चित्रीकरण करणारी सहा, चित्रीकरण पाहणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे. कसब्यात भरारी आणि अवैध रोकड तपासणारी प्रत्येकी नऊ पथके, चित्रीकरण करणारी दोन, चित्रीकरण तपासणारी आणि हिशोबाचे प्रत्येकी एक पथक आहे.

COMMENTS