Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात मनोरुग्णालयाच्या बाहेर संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाचे आंदोलन 

ठाणे प्रतिनिधी - शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक संजय राऊत यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात भरती  करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसां

मोबाईलवर बोलताना हटकले, पतीला चक्क बॅटने बदडले…
परभणीला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून दूर ठेवण्यास प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी आंचल गोयल
महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

ठाणे प्रतिनिधी – शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक संजय राऊत यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात भरती  करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रुग्णालयात रुग्णवाहिका नेण्यास मनाई केली. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यावेळी रुग्णालयात संजय राऊत यांचे दाखल पत्र रुग्णालयातील अधीक्षकांना देण्यात आले, तसेच संजय राऊत यांच्या करिता या रुग्णालयात बेड ही बुक करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता भोसले,मालती पाटील, यांच्या सह सर्व पदाधिकारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आलेल्या पाहायला मिळाल्या. 

सध्या संजय राऊत यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते कशाही प्रकारचे वक्तव्य करत असून यासंदर्भात ठाणे महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात संजय राऊत यांच्या करिता बेड बुक करण्यात आला.  यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांच्या संदर्भात ते आमचे पूर्वीचे नेते असून त्यांच्या संदर्भात आपुलकीची भावना व्यक्त करत आम्ही हा निर्णय घेत असल्याचेही माध्यमांसमोर सांगितले.

COMMENTS