Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरती चाचणीनंतर तरूणाचा मृत्यू

मुंबईः पोलिस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरूणाचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी माता

फडणवीसांची फालतू बडबड; तर, राऊतांचा मुद्दा गंभीर !
शेतकर्यांसाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व महाबीज यांनी एकत्र येवून काम करावे- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
मलायका अरोरा-अर्जुन कपूरचा यांचा ब्रेकअप ?

मुंबईः पोलिस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरूणाचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमर अशोक सोलके(24) असे मृत तरूणाचे नाव असून तो अमरावती येथील नवसारीतील रहिवासी आहे. तो पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मुंबईत आला होता. तो सध्या फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. सोलकेने मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचीत व्यक्तीला सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास सोलके हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सोलकेशी परिचीत तरूणीचा जबाब नोंदवून एमआरए मार्ग पोलीसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

COMMENTS