Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तर

फेब्रुवारी २०२३ यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. आज या परिक्षेतील पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. परंतु महाराष

मुंबईत 18 वर्षीय तरूणाची हत्या
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना धमकीचा फोन
नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात

फेब्रुवारी २०२३ यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. आज या परिक्षेतील पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्याच इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुक आढळली. परिणामी राज्य मंडळाला प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीबद्दल विद्यार्थ्यांना सहा गुण द्यावे लागणार आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे. राज्य मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिकेच्या छपाईत झालेल्या चुकीचा लाभ मात्र विद्यार्थ्यांना होणार आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पहिला पेपर आहे. या पेपरमध्ये कवितेवर आधारित तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नात ए-३ आणि ए-५ क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळाकडून छापण्यात आले नाहीत. तर ए-४ क्रमांकाच्या प्रश्न विचारण्याऐवजी त्याठिकाणी उत्तर छापण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असून एकूण सहा गुणांचे प्रश्नांत चुक झाली आहे. याशिवाय बारावीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत आणखी एक चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. तीन क्रमांकाच्या ‘बी’ प्रश्नांमध्ये कवितेचे ‘ॲप्रीसिएशन’ करण्यास सांगणारा चार गुणांचा प्रश्न विचारण्यात आला, मात्र, ही प्रशंसा कशाच्या आधारे करायची, यासंदर्भात प्रश्नांमध्येच मुद्दे देणे अपेक्षित होते. परंतु हे मुद्दे प्रश्नपत्रिकेत देण्यात आलेले नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत राज्य मंडळाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. परीक्षेच्या नियामकांच्या अहवालानंतर याबाबतही चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. याबाबत राज्य मंडळास विचारणा केली असता, ‘‘प्रश्नपत्रिकेत छपाईची चूक झाल्याचे खरे आहे. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य मंडळाला नाही, तर परीक्षेच्या नियामकांकडून याबाबत अहवाल मागविण्यात येईल. त्यांच्या अहवालात प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जातील.’’ असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे.

COMMENTS