Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात ?

शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाची सध्या चहुबाजूंनी कोंडी झाली असतांना, शिवसेना पुन्हा एकदा ठाकरे गटाची मोठी कोंडी करण्याच्या तयारीत आहे. चिन्ह आणि पक

शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून इतर कामे देणे चुकीचे
श्रीक्षेत्र भाळवणी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
दुष्काळसदृश स्थितीत शिरूर पं.स.शेतक-यांना खंबीर साथ देईल-डॉ.सचिन सानप

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाची सध्या चहुबाजूंनी कोंडी झाली असतांना, शिवसेना पुन्हा एकदा ठाकरे गटाची मोठी कोंडी करण्याच्या तयारीत आहे. चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका दिला जाऊ शकतो. ठाकरेंचे विधानपरिषदेमध्ये असलेले विरोधी पक्षनेतेपद घालवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हालचाली केल्या जात आहेत.

विद्यमान शिवसेनेच्या आमदारांपैकी किंवा नवनियुक्त अपक्ष आमदारांपैकी विधानपरिषद सभागृह गटनेत्याची नियुक्ती करून व्हिप जारी केला जाऊ शकतो. या व्हिपची अंमलबजावणी शिवसेनेतील सर्वच सदस्यांना बंधनकारक राहील. तसेच या व्हिपचे उलंघन झाल्यास संबंधित आमदारावर कारवाईचीही मागणी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या नवनियुक्त गटनेत्याचा आदेश उद्धव ठाकरे यांना देखील मान्य करावा लागेल. त्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंचे विरोधीपक्ष नेते पदही धोक्यात येऊ शकते.

दरम्यान, ठाकरे गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर शिंदे गट सक्रिय झाला आहे. एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आज मंगळवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या कार्यकारणीच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार असून ते सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी, खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानतंर शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देऊ शकते. शिंदे गटाकडून आता ठाकरे गटाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. एकीकडे राज्यभरातील शिवसेनेचे कार्यलये ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाने सुरु केलेले आहेत.

व्हीप आम्हाला लागू होऊच शकत नाही ः उद्धव ठाकरे – एकीकडे शिवसेनेचे नेते ठाकरे गटाच्या आमदारांना आमचा व्हीप पाळावा लागेल, अन्यथा त्यांचे निलंबन करू असा इशारा देत असतांना, दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही वेगळा पक्ष असून निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला नाव आणि चिन्ह देखील दिले आहे. त्यामुळे त्यांचा व्हिप आम्हाला लागू होऊच शकत नाही असा दावा केला आहे. ठाकरे गटाकडे सध्या विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद आहे. मात्र ठाकरे गटाकडे शिवसेना पक्ष नसल्यामुळे, शिंदे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपद देखील हातातून निसटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेना भवनही जाणार? धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार – शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे योगेश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. कोणत्याही ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही. एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? परवानगी नसताना राजकीय पक्षाचे कार्यालय, इतक्या दिवस का वापरले, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

COMMENTS