इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी युवा नेते, राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक जयंत पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी युवा नेते, राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील साखराळे यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष व राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरबसे यांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार केला. युवा कार्यकर्त्यांनी तुतारी, हालगी-घुमके आणि डीजेचा ठेका, फटाक्यांची आतिष बाजी आणि गुलालाची उधळण करत ’आनंदोत्सव’ साजरा केला. हत्तीच्या सोंडेने आणि क्रेनने प्रतिक पाटील यांना मोठा हार घालण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष- उपाध्यक्षांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या मिटींग हॉलमध्ये नूतन संचालक मंडळाच्या बैठक झाली. बैठकीत संचालक कार्तिक पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी प्रतिक पाटील यांचे नांव सुचविले. त्यास ज्येष्ठ संचालक रघुनाथ जाधव यांनी अनुमोदन दिले. तसेच माजी जि. प. अध्यक्ष, संचालक देवराज पाटील यांनी उपाध्यक्ष पदासाठी विद्यमान विजयराव पाटील यांचे नांव सुचविले. त्यास सत्यविजय बँकेचे अध्यक्ष, संचालक बाळासाहेब उर्फ प्रकाश पवार यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याच्या प्रगतीस अधिक गती देवू, असा विश्वास नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी व्यक्त केला. बैठकीस प्रदीपकुमार पाटील, विठ्ठल पाटील, दादासाहेब मोरे, सौ. मेघा पाटील, प्रा. डॉ. सौ. योजना शिंदे-पाटील, अतुल पाटील, शैलेश पाटील, बबनराव थोटे, प्रतापराव पाटील, रमेश हाके, दीपक पाटील, रामराव पाटील, अमरसिंह साळुंखे, राजकुमार कांबळे, हणमंत माळी आदी संचालक उपस्थित होते. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रिया होण्यासाठी उपनिबंधक रंजना बारहाते, सहाय्यक सोमनाथ साळवी, कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सहकार्य केले.
प्रा. शामराव पाटील, विट्याचे वैभव पाटील, अॅड. बाबासो मुळीक, रविंद्र बर्डे, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, किसन जानकर, नेताजीराव पाटील, छाया पाटील, संभाजी कचरे, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, शिवाजीराव साळुंखे, शंकरराव पाटील, सुहास पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, दिलीपराव देसाई, उदयबापू पाटील, संग्राम जाधव, देवराज देशमुख, सचिन कोळी, स्वरूप मोरे, शिवाजी चोरमुले, राजकेदार आटूगडे, उमेश पवार, सूरज कचरे, सचिन पाटील, विनोद बाबर, आबासाहेब पाटील यांच्यासह राजारामबापू परिवारातील पदाधिकारी-अधिकारी, तसेच आजी-माजी संचालक व युवक कार्यकर्त्यांनी प्रतिक पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
COMMENTS