Homeताज्या बातम्यामनोरंजन

कार्तिक झळकला बुर्ज खलिफावर

कार्तिक आर्यन स्टारर 'शेहजादा' च्या निर्मात्यांनी आता जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथे चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. कार्तिक आ

प्रवीण सूद सीबीआयचे नवे संचालक
काँग्रेस नेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन महोत्सव
आशियाई चित्रपट महोत्सवाला 12 जानेवारीपासून सुरुवात

कार्तिक आर्यन स्टारर ‘शेहजादा’ च्या निर्मात्यांनी आता जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथे चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘शेहजादा’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘कैरेक्टर ढीला 2.0’ हे गाणे रिलीज झाले आहे. अलीकडेच दिल्लीच्या इंडिया गेटवर ‘शेहजादा ‘च्या टायटल ट्रॅकचे लाँचिंग करण्यात आले. जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफावर आता ‘शहजादा’ची झलक उजळली आहे.

रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे निर्माते प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अलीकडेच कार्तिकने प्रतिष्ठित बुर्ज खलिफा येथे प्रमोशनची जबाबदारी घेतली आणि चित्रपटाचा प्रमोशनल टीझर प्रदर्शित केला. तो सोशल मीडियावर म्हणाला, “शहजादा सारखं वाटत आहे… जगाच्या शिखरावर, शाब्दिक रुपात #बुर्जखलिफा. रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक, क्रिती सेनॉन, मनिषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांच्या भूमिका आहेत. 

COMMENTS