Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री उत्तम खंदारेंविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा

शासकीय विश्रामगृहात बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप

पुणे/प्रतिनिधी ः भाजप-शिवसेना अर्थात युतीच्या काळात 1995 मध्ये सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री पद भुषविणार्‍या उत्तम खंदारेंविरुद्ध अत्याचाराचा ग

दुधाच्या 30 रूपये दरावर शिक्कामोर्तब
*म्युकर मायकोसिसचे संक्रमण हवेतून होऊ शकते – डॉ.गुलेरिया | पहा सुपरफास्ट २४ | LokNews24*
मध्यप्रदेशात भाजपचे ओबीसी कार्ड

पुणे/प्रतिनिधी ः भाजप-शिवसेना अर्थात युतीच्या काळात 1995 मध्ये सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री पद भुषविणार्‍या उत्तम खंदारेंविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंदारे यांच्यासह महादेव भोसले आणि आणखी एका महिलेवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अत्याचार करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत व मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे 37 वर्षीय महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 2012 पासून बिबेवाडीतील बी रेस्ट हाउस, पोकळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी भा.द.वि 376, 377, 406, 420, 506 (2) आणि 34 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चाकूचा धाक दाखवत तिच्यावर खंदारे यांच्याकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. उत्तम खंदारे यांनी फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या मुलांचा सांभाळ करतो असे म्हणत अनेकदा तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक संबंध ठेवले. त्यास विरोध केल्याने तिला मारहाण केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS