Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत साई परिक्रमा भक्तिमय वातावरणात उत्साहात

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी ग्रामस्थ व ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन आयोजित शिर्डी साई परिक्रमा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. सोमवारी सकाळी साडे पा

छत्रपती प्रतिष्ठानच्या पारितोषिकांचे 9 एप्रिलला वितरण
विठ्ठलराव वाडगे यांना सरपंच सेवा संघाचा पुरस्कार प्रदान
रुग्णांसाठी न्यू लाईफ हॉस्पिटल संजीवनी ठरणार : आ. प्रा. राम शिंदे

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी ग्रामस्थ व ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन आयोजित शिर्डी साई परिक्रमा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. सोमवारी सकाळी साडे पाच वाजता महंत रामगिरी महाराज, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ना दिपक केसरकर, खासदार सदाशिव लोखंडे, साई संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते साई निर्माण ग्रुपचे विजय कोते, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री खंडोबा मंदिरापासून या ऐतिहासिक परिक्रमेला सुरुवात झाली.

देश विदेशातून सुमारे एक लाखापेक्षा अधिक संख्येने भाविक या परिक्रमेत सामील झाले होते.चौदा किलोमीटर अंतर असणारी ही भव्यदिव्य परिक्रमा सुरू असताना साई नामाचा गजर ढोल ताशा, टाळ मृदुंग तसेच पारंपरिक वाद्याच्या   समवेत शिर्डी दुमदुमून गेली होती.अतिशय शिस्तबद्ध, चोख नियोजन, सुरक्षा, चहा, कॉफी, नास्ता, थंड पेय , फळे याची परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी शिर्डी ग्रामस्थांनी व्यवस्था केली होती, पोलीस बंदोबस्त, रुग्णवाहिका डॉक्टरांच्या वेगवेगळ्या टीम, शेकडो स्वयंसेवक ह्या चौदा किलोमीटरच्या परिसरात तैनात होते. शिर्डीतील अनेक ग्रामस्थांनी एकत्र येऊन अन्नदान तसेच पारिक्रमेसाठी लागणार्‍या सर्व यंत्रसामुग्री यांसह हजारो भाविकांना मोफत राहण्याची व्यवस्था करून दिली तर अनेक हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलच्या खोल्या ह्या पन्नास टक्के कमी दराने भाविकांना उपलब्ध करून दिल्या.यावेळी क्रांती युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन तांबे, प्रमोद गोंदकर, निलेश कोते,अँड अनिल शेजवळ,  ताराचंद कोते, सोसायटीचे चेअरमन विजय गोंदकर, भाजपचे सुधीर शिंदे, सचिन शिंदे, दिपक वारुळे,  रवींद्र गोंदकर, दीपक गोंदकर, मणीलाल पटेल, प्रवीण महामुनी, नितीन कोते, अजय नागरे, अजित पारख यांनी देश विदेशातून आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानून पुढीलवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साई परिक्रमेला येण्याचं आवाहन केले. शिर्डीतील ऐतिहासिक साई परिक्रमेत देश विदेशातील लाखो साईभक्त एकाचवेळी पाहून शिर्डीत भाविकांचा महाकुंभ भरल्याचा आनंद बघावयाचे भाग्य सर्वांना मिळाले हे या परिक्रमेतुन साध्य झाले असल्याची प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराज यांनी दिली.

COMMENTS