देवेंद्रांना राजकीय संन्यास घेऊ देणार नाहीः खा. राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवेंद्रांना राजकीय संन्यास घेऊ देणार नाहीः खा. राऊत

सत्ता ताब्यात द्या, इतर मागासवर्यींना चार महिन्यांत आरक्षण दिले नाही, तर राजकीय संन्यास घेऊ, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना खासदार संजय राऊत यांनी मात्र देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे.

श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर
झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी गाढव मोर्चा : अ‍ॅड. राजू भोसले
‘सुपरस्टार सिंगर 2’चा विजेता ठरला मोहम्मद फैज

मुंबई/प्रतिनिधी: सत्ता ताब्यात द्या, इतर मागासवर्यींना चार महिन्यांत आरक्षण दिले नाही, तर राजकीय संन्यास घेऊ, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना खासदार संजय राऊत यांनी मात्र देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहे, असे म्हटले आहे. 

तीन ते चार महिन्यांत ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून दिले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी भाष्य केले. फडणवीस लढवय्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावे, संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून त्यांना सांगेन. तुमचे राजकीय भाषा उज्ज्वल आहे, असेही राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या, तरी किमान समान कार्यक्रमानुसार सरकार सुरू आहे. भांड्याला भांडे लागणारच, ते लागायलाही हवेच, तरच संसार टिकतो. भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही भांड्याला भांडी लागत होती. एवढेच नाही, तर भांडी फुटत होती, तरीही सरकार पाच वर्षे टिकले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्‍वास राऊत यांनी व्यक्त केला. भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, यासाठी चक्का जाम आंदोलन केले. नागपुरात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. या वेळी फडणवीस यांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले; पण आमच्या हातात पुन्हा सूत्रे दिली, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असे ते म्हणाले होते.

COMMENTS