Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. ह

नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल
‘इंडिया’विरुद्ध भारत वाद पेटणार
सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. हरीश साळवे यांनी तर, ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. आज बुधवारी यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे याचा निकाल कधी लागतो, याची उत्सुकता ठाकरे गटासह, शिंदे गटाला देखील लागली आहे.
काल झालेल्या युक्तीवदामध्ये सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरून दोन्ही पक्षाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद रंगला. यावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. सत्तासंघर्षाच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याऐवजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे कामकाज पहात होते. अध्यक्षांच्या गैरहजेरीत उपाध्यक्षांना पूर्णपणे कामाचे अधिकार असतात.त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाच्या अधिकारांचाच उल्लेख युक्तिवादात करण्यात आला. मात्र अध्यक्ष हे ठराविक पक्षाकडे झुकलेले असतात, त्यांनी पक्षपाती असू नये, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या वतीने करण्यात आला. सिब्बल म्हणाले की, 16 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली, तेव्हा विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव नव्हता. या नोटिशीनंतर काही वेळाने अविश्‍वास ठराव आणण्यात आला. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव होता. त्यामुळे त्यांचे अधिकार संपुष्टात येतात, असं होत नाही, असं सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला. नोटीस दिल्यानंतर पूर्ण प्रक्रिया झालेली नव्हती. त्यामुळे ते कारवाई करू शकतात, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडला.

COMMENTS