Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिवॉर्ड पॉइंटच्या नावाने महिलेची ऑनलाइन फसवणूक

मुंबई : रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून 59 वर्षांच्या महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अंधेरी परिसर

मावळच्या दुर्गम भागात पुष्पा गॅंगचा धुमाकूळ
प्लास्टिक बॅगमध्ये सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे
सासरच्या छळाला कंटाळून कर्जतमध्ये विवाहितेची आत्महत्या

मुंबई : रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून 59 वर्षांच्या महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध अंधेरी पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
तक्रारदार महिला पती आणि दोन मुलांसोबत अंधेरीतील तेलीगल्ली परिसरात राहतात. 23 जानेवारी 2023 रोजी त्या कुटुंबियांसोबत बंगळुरू येथे फिरायला गेल्या होत्या. ते सर्वजण 3 फेब्रुवारीला मुंबईत आले. त्यानंतर सात दिवसांनी म्हणजेच शुक्रवार, 10 फेब्रुवारीला त्यांच्या पतीच्या मोबाइलवर क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंटसंदर्भात एक लिंक आली होती. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती दिली होती. माहिती दिल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून काही ऑनलाइन व्यवहार झाले. या व्यवहारातून त्यांच्या कार्डवरून सुमारे दोन लाख रुपयांचे व्यवहार झाले होते. ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच या महिलेने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला दूरध्वनी करून पतीच्या क्रेडिट कार्डवरून होणारे व्यवहार बंद केले. त्यानंतर तिने अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी क्रेडिटकार्ड कंपनीकडून व्यवहारांबाबत माहिती मागवली आहे. त्या आधारे तपास करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

COMMENTS