Homeताज्या बातम्याविदेश

तुर्की-सीरियात हाहाकार! भूकंपामुळे आतापर्यंत 11 हजार लोकांचा मृत्यू

अंकारा प्रतिनिधी - तुर्कस्तान व सीरियातील भूकंपबळींची संख्या ११ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा वि

सुखराम यांच्यामुळेच…
कुरघोडी करणार्‍या चीनला खडसावले
तरुणीला नाकातून गांजाची धुरी देत अत्याचार

अंकारा प्रतिनिधी – तुर्कस्तान व सीरियातील भूकंपबळींची संख्या ११ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट देत आहेत. त्यांनी सांगितले, की एकटय़ा तुर्कस्तानमधील मृतांची संख्या साडे आठ हजारांच्या पुढे गेली आहे. पहिल्या दिवशी बचावकार्य तोकडे पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु त्यानंतर आता मदत कार्याने वेग घेतला आहे, याबाबत स्थिती सुधारल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या कोणत्याही नागरिकास आम्ही मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याचे एर्दोगान यांनी स्पष्ट केले. तुर्कस्तान व सिरियात भूकपग्रस्त भागात ठिकठिकाणी अनेक बचाव पथके दिवस-रात्र काम करत आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे कोसळलेल्या हजारो इमारतींच्या ढिगाऱ्यांतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. बुधवारी मृतांची संख्या अकरा हजारांवर गेली आहे. हा भूकंप एका दशकाहून अधिक काळातील सर्वात प्राणघातक ठरला आहे.

COMMENTS