वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवावी

स्थानिक शेतकऱ्यांची मागणी

नाशिक प्रतिनिधी - निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याने या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेतय. मागेच याच ठिकाणी चिमु

सत्ता संघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तीकडेच
पाथर्डी नगरपरिषदेवर धडकला हंडा मोर्चा
नाल्यात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेले मृतदेह

नाशिक प्रतिनिधी – निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याने या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेतय. मागेच याच ठिकाणी चिमुकल्याला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहे. 

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे द्राक्ष बागेच्या कामावरून शेतमजूर परत येत असताना आई-वडिलांच्या देखत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत सात वर्षाच्या चिमुकल्याला उचलून नेत मक्याच्या शेतात ठार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथील स्थानिक शेतकरी शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात पिंजरे लावावे, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय करत आहेत.अक्षरशः शेतात काम करायला जाण्यासाठी जोडीने सोबत कोणालातरी घेऊन जाण्याची वेळ येत असल्याने अथवा चार-पाच लोक शेतात असले तरच काम करायला जात असल्याची परिस्थिती या परिसरात निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने येथे ठिकठिकाणी पिंजरे लावावे व बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

COMMENTS