Homeताज्या बातम्यादेश

सलवा जुडूम’चे प्रणेते मधुकर राव यांचे निधन

वारंगल : महेंद्र कर्मा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सलवा जुडूम’चे प्रणेते मधुकर राव यांचे मंगळवारी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. तेल

श्री साईपावन प्रतिष्ठानच्या नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद
ब्राह्मणेतर समाजाकडे श्रध्दास्थळांचा ताबा द्या!
Kopargaon : तरुणाची लोखंडी रॉडने व दगडाने ठेचून केली हत्या | LOKNews24

वारंगल : महेंद्र कर्मा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सलवा जुडूम’चे प्रणेते मधुकर राव यांचे मंगळवारी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. तेलंगणातील वारंगल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. नक्षलवादाविरोधात आवाज बुलंद करणारा चेहरा म्हणून ते सर्वश्रुत होते. त्यांच्या पार्थिवावर छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील कुटरू गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘सलवा जुडूम’ हा गोंडी या प्रादेशिक आदिवासी भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ ’शांतीचा वाहक’ असा होतो. 2013 मध्ये सुकमा येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेलेले काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांना सलवा जुडूमचे जनक मानले जाते. महेंद्र कर्मा यांनी 2005 मध्ये सलवा जुडूम मोहीम सुरू केली जेव्हा छत्तीसगडमध्ये नक्षलवादी घटना वाढू लागल्या होत्या. नक्षलवादी किंवा माओवाद्यांशी लढण्यासाठी सामान्य लोकांचा सहभाग सुनिश्‍चित करणे हा त्यांचा उद्देश होता. महेंद्र कर्मा यांनी मधुकर राव यांच्यासारख्या सहकार्‍यांसह ही मोहीम पुढे नेली. छत्तीसगडच्या कुटरूचे रहिवासी असलेले मधुकर राव हे व्यवसायाने शिक्षक होते. 2005-2006 मध्ये कुटरू येथील आंबेली येथून सुरू झालेल्या नक्षलवाद्यांविरोधातील सलवा जुडूम मोहिमेचा भाग बनल्यानंतर त्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांनंतर मधुकर राव सलवा जुडूम मोहिमेत सामील झाले आणि त्याचे नेतृत्व करू लागले. सध्या मधुकर राव कुटरू येथे पंचशील आश्रम चालवत होते. सलवा जुडूमचा हा नेता कुटरूमध्ये कडेकोट बंदोबस्तात राहत असे. तेथे तो अनाथ मुलांना शिक्षण देत असे. मुधुकर राव नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. राव यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र नक्षलवाद्यांना यश आले नाही.

COMMENTS