Homeताज्या बातम्यामनोरंजन

भारताच्या रिकी केजने तिसऱ्यांदा जिंकली ग्रॅमी पुरस्काराची ट्रॉफी

अमेरिका प्रतिनिधी - २०२३ नवीन वर्षातील बहुप्रतिक्षित अशा ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले. यावर्षी या सोहळ्याचे ६५ वे वर्ष होते. संगीत क्ष

वेगळा आणि विरळा अभिवादक! 
भारताचा जीडीपी 6.5 टक्के राहण्याचा अंदाज
दहा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून मृत्यू

अमेरिका प्रतिनिधी – २०२३ नवीन वर्षातील बहुप्रतिक्षित अशा ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले. यावर्षी या सोहळ्याचे ६५ वे वर्ष होते. संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक म्हणू गर्मी पुरस्कार ओळखला जातो. अमेरिकेमधील लॉस एंजेलिस शहरामध्ये नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. जगभरातील संगीत क्षेत्रामधील जवळपास सर्वच दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा भारताचा डंका वाजला आहे. भारतातील बेंगळुरू येथे राहणाऱ्या रिकी केज यांनी या पुरस्कारांमध्ये तिसऱ्यांदा बाजी मारत हॅट्रिक साजरी केली. त्यांनी त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. रिकी यांनी हा पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार आणि ब्रिटिश रॉक बँड ‘द पुलिस’मधील ड्रमर स्टीवर्ट कोपलँड याच्यासोबत विभागून घेतला. स्टीवर्ट कोपलँड यांनी देखील रिकीच्या डिव्हाइन टाइड्स या अल्बममध्ये सहयोग दिला आहे.

६५ व्या या पुरस्कारांमध्ये दोघांना सर्वोत्कृष्ट इमर्सिव ऑडियो एल्बम या विभागात हा पुरस्कार मिळाला. त्यांना ग्रामोफोनच्या रूपात ट्रॉफी देण्यात आली. प्रसिद्ध संगीतकार रिकी केज यांनी २०१५ साली ‘विंड्स ऑफ समसारा’साठी पहिल्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर २०२२ साली त्यांनी त्यांच्या ‘डिवाइन टाइड्स’ अल्बमसाठी ‘बेस्ट न्यू एज एल्बम’ या विभागात ग्रॅमी मिळवला होता. एका माहितीनुसार रिकी यांनी जगभरातील ३० देशांमधील जवळपास १०० संगीत पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्याकडे यूनाइटेड नेशन्स ग्लोबल ह्यूमैनिटेरियन आर्टिस्ट आणि यूथ आयकॉन ऑफ इंडिया साठी नामांकन देखील देण्यात आले होते. ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बममध्ये एकूण नऊ गाणी आणि आठ म्युझिक व्हिडीओचा समावेश आहे. या म्युझिक व्हिडीओंमध्ये जगभरामधील नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.रिकी केजने मिळवलेल्या या मोठ्या पुरस्कारानंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील त्याच्यावर अभिनंदचा वर्षाव केला आहे. रिकी केज यांनी पुरस्कार पटकावल्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत सगळ्यांना धन्यवाद म्हटले असून, हा पुरस्कार त्यांनी भारत देशाला समर्पित केला आहे.

COMMENTS