Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसमधील गोंधळ

महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार नाना पटोले यांच्याकडे आल्यानंतर राज्यात त्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न क

विकासाचे राजकारण…
लोकशाहीतील सोयीचे राजकारण
कर्मचारी कपातीचे संकट

महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार नाना पटोले यांच्याकडे आल्यानंतर राज्यात त्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्याचा सातत्याने सुरू आहे. कारण पटोले एकतर ओबीसी नेते असून, ते आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी थेट नाना पटोले यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. राज्यात काँगे्रसला नवसंजीवनी देणारा आणि आपल्या पक्षाचा विस्तार करणारा आक्रमक नेता हवा होता. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समूहाला राजकीय आरक्षण रद्दबादल ठरल्यानंतर ओबीसी समाजात एक रोष उत्पन्न झाला होता, या पार्श्‍वभूमीवर काँगे्रस नेत्यांनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असून, त्यात तांबे यांनी भरच टाकली. विशेष म्हणजे सत्यजित तांबे गेल्या 20-22 वर्षांपासून विविध पदांवर काम करतांना दिसून येत आहे. त्यांची काम करण्याची वृत्ती, संघटन कौशल्य वादातीत आहे. मात्र सत्यजित तांबे 20-22 वर्षांपासून राज्यस्तरावर काम करत असतांना, त्यांचे मामा आणि काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देखील काही वर्ष काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार राहिलेला आहे.

तसेच त्यांचे आणि सत्यजित तांबे यांचे देखील पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत चांगले संबंध राहिलेले आहेत. अशावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांना महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी का देऊ नये. तांबे यांनी काल एक.के. पाटील यांच्याकडे पक्षात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केल्याचे सांगितले. मात्र पक्षाने तुमचे वडील आमदार आहेत, त्यामुळे तुम्हाला पद देता येणार नसल्याचे सांगितले. खरंतर काँगे्रसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीच एका कुटुंबात एकच पद देता येईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आई नगराध्यक्ष, वडील आमदार असतांना, परत मुलगा पद मागतोय, या बाबी वरिष्ठांना नक्कीच खटल्या असतील. त्यामुळे त्यांना संधी दिली नसावी. राहिला प्रश्‍न एबी फॉर्मचा. तर यासंदर्भात काँगे्रसने सरळ सरळ एक समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची खरी गरज आहे. शिवाय तांबे जर नवखे असते, तर त्यांना काँगे्रसमधे त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे असे एकवेळ समजू शकलो असतो. मात्र त्यांचे मामा बाळासाहेब थोरात काँगे्रसमधील ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय त्यांचा सर्वांना एकत्र ठेवण्याची हातोटी, आक्रमक न होता शांत राहून काम करण्याची वृत्ती काँगे्रसमधील नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री पद भूषवलेल्या थोरात यांचे भाचे आणि युवक काँगे्रसमध्ये अनेक वर्ष खर्ची घालणार्‍या सत्यजित तांबे यांना त्रास देण्याचे किंवा, त्यांची अडवणूक करण्याचे काहीही कारण नाही. थोरांताचे खच्चीकरण करण्यासाठी काँगे्रसमधीन नेत्यांनीच रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप देखील तांबे यांनी केला आहे.

थोरात आणि पटोले यांचा मतदारसंघ काही शेजारी-शेजारी नाही. त्याचप्रमाणे पटोले प्रदेशाध्यक्ष असून, त्यांचे काम पक्षाला विजय मिळवून देणे, पक्षाला कार्यक्रम देणे आहे. आणि त्यांचे काम ते चोख करतांना दिसून येतात. अनेकवेळेस त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसवर टीका करण्यास देखील मागेपुढे पाहिलेले नाही. त्यामुळे आपल्या स्पष्ट वक्तेपणांसाठी प्रसिद्ध असलेल्या पटोलेंवर थेट आरोप करणे चुकीचे आहे. त्याचबरोबर याप्रकरणी आता थेट बाळासाहेब थोरात यांनीच पुढे येऊन बोलले पाहिजे, तरच या वादावर पडदा पडू शकेल. बरं एबी फॉर्म चुकीचे आले, ही भूमिका तांबे यांनी निवडणुकीच्या आधी का मांडली नाही. त्यांनी सस्पेन्स का वाढवला. भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतांना, त्यांनी भाजप प्रवेशाचे खंडन का केले नाही. असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतात. मात्र यावर काँगे्रसचे ज्येष्ठ नेते थोरात जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत काँगे्रसमध्ये असाच गोंधळ आणखी काही दिवस सुरू राहू शकतो. 

COMMENTS