Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विमानतळावर 33.60 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने मोठी कारवाई केली आहे. डीआ

शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात : डॉ. स्वामीनाथन
देवळाली प्रवरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी उत्साहात
राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन द्या : नवाब मलिक

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने मोठी कारवाई केली आहे. डीआरआय अधिकार्‍यांनी मुंबई विमानतळावर आदीदी अबाबाहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 33.60 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. त्याने 3.36 किलो ड्रग्ज साबणाच्या स्वरूपात लपवून आणले होते.
डीआरआय अधिकार्‍यांना या प्रवाशाचा संशय आला. यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. सामानाची झडती घेतली असता अधिकार्‍यांच्या हातात एक साबण आला. साबणाचा शोध घेतला असता सत्य बाहेर आले. प्रत्यक्षात झडतीदरम्यान अधिकार्‍यांना एक बॉक्स आढळून आला. हा बॉक्स साबणाचा होता. या कव्हरमध्ये अधिकार्‍यांना पांढर्‍या रंगाचा साबण दिसला. त्याची अधिक नीट तपासणी केली असता अधिकार्‍यांच्या हाताला वॅक्स चिकटू लागले. यानंतर अधिकार्‍यांनी साबण घासण्यास सुरुवात केली. वॅक्स घासल्यानंतर आत साबणासारखा तुकडा दिसला. पण तो साबण नव्हता. सखोल तपास केला असता तो साबण नसून कोकेन असल्याचे आढळून आले. कोकेनच्या या साठ्याचे वजन केल्यानंतर ते 3360 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अंदाजे 33 कोटी 60 लाख रुपये आहे. आदीदी अबाबाहून आलेल्या या भारतीय प्रवाशाला डीआरआयच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

COMMENTS