शरद पवार-ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा ; अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रणनीती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार-ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा ; अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रणनीती

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे होत आली असली, तरी अद्याप महामंडळांचे वाटप झालेले नाही.

खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी
मुंबई महापालिकेच्या मदतीला बॉलिवूडकर सरसावले, अजय देवगणकडून 1 कोटींची देणगी | Bollywood | LokNews24
क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा स्मृतीस्तंभ उभारणार : निरंजन डावखरे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे होत आली असली, तरी अद्याप महामंडळांचे वाटप झालेले नाही. महामंडळांचे वाटप करून सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील दुसर्‍या फळीतील नेत्यांना दिलासा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या आजच्या भेटीत महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत; मात्र कोरोना निर्बंधांबाबत अन्य राज्यांतील स्थितीचा आणि निर्णयाचा आढावा घेतला पाहिजे. सततच्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य जनतेत आणि व्यापार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याचबरोबर राज्याची आर्थिक घडीही विस्कटत आहे. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसने केली. तसेच विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल असा दावाही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून राज्य सरकारवर सातत्याने हल्ला सुरू ठेवला आहे. या पार्श्‍वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करू नये. महाविकास आघाडी निवडणूक जिंकेल. त्याबाबत चिंता नको, अशी चर्चाही या बैठकीत झाली असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे पवार यांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हेसुद्धा वर्षावर उपस्थित होते. त्यानंतर संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्वत: पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले. देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीअंती अटक केली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. सरकारचे डॅमेज कंट्रोल, ईडी चौकशीला कसे सामोर जायचे, यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

शेट्टी यांची मुख्यमंत्री भेटत नसल्याची तक्रार

राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व इतर नेते उपस्थित होते. या वेळी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्य शासनाने याबाबत ठोस भूमिका मांडावी, असा आग्रह पवार यांच्याकडे धरला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांना नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली; पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही, अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली. पवार यांनी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर

COMMENTS