नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था येत्या आर्थिक वर्षात 6 ते 6.8 टक्के वाढेल अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केल
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था येत्या आर्थिक वर्षात 6 ते 6.8 टक्के वाढेल अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वोक्षणात व्यक्त केली आहे. त्यांनी 2022-23 चा आर्थिक अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. आर्थिक सर्वेक्षणात 2023-24 चा जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील 3 वर्षांचा विचार केला तर ही वाढ सर्वात कमी असणार आहे.
याआधी 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 8.7 टक्के होता. भारत जगातील सर्वात वेगाने विकास होणारी अर्थव्यवस्था होत आहे. आर्थिक विकास वैयक्तीक खर्च, कॉरपोरेट बॅलेंस शीट्स, छोट्या व्यावसायिकांमधील क्रेडिट ग्रोथ आणि प्रवासी मजूर पुन्हा शहरात परत आल्याने होत आहे, असेही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये नमूद आहे. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये प्रमुख शहरांतील (मेट्रो सिटी) घरांच्या किंमतींमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सेवा क्षेत्राने 2022-23 या वर्षात 8.4 टक्के वाढ नोंदवली पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये 9.1 टक्के वाढ अपेक्षित आहे. कोरोनामुळे झालेल्या तोट्याची भरपाई पूर्ण झाली आहे. करोनाच्या काळात देशाची आर्थिक घडी विस्कटली होती मात्र यावर्षी ती भरून निघाला आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.सेवा क्षेत्राला बँकांकडून होणार्या वित्तपुरवठ्यातही सकारात्मक वाढ झाली आहे. ही वाढ 21 टक्क्यांची आहे. वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून भारतातून येणार्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. चांगल्या जगातील 46 देशांमध्ये भारताचा क्रमांक दहावा आहे अशी माहिती आर्थिक अहवालात नोंदवण्यात आली आहे. भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही चांगला वाढला आहे. जागतिक गुंतवणूक अहवालात जगभरातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणार्या 20 देशांमध्ये भारताचं स्थान आठवे आहे. भारतात यावर्षी 84 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. त्यातील एकट्या सेवाक्षेत्रात 7.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.
महागाई दर 6.8 टक्क्यांवर – रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार 2022-23 मध्ये देशात महागाईचा दर 6.8 टक्के असेल. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेट वाढवला जाईल. यामुळे कर्जावरील व्याज दीर्घ काळासाठी उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील इतर देशांच्या तुलनेत वेगाने आर्थिक प्रगती केली आहे. देशांतर्गत मागणी, भांडवली गुंतवणूक वाढल्याने विकासाला बळ मिळेल, असेही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये नमूद आहे. या सर्व्हेमध्ये जीडीपी बाबतचा अंदाज, चलनवाढ अंदाज, परकीय चलन साठा, व्यापारी तूट अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
सेवा क्षेत्रात 7.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक – भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही चांगला वाढला आहे. यूएनसीटीएडी 2022 च्या जागतिक गुंतवणूक अहवालात जगभरातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणार्या 20 देशांमध्ये भारताचे स्थान आठवे आहे. भारतात यावर्षी 84 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. त्यातील एकट्या सेवाक्षेत्रात 7.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.
कर्ज महागणार – रिझर्व्ह बँकेनुसार देशात सध्या महागाईचा दर 6.8 टक्क्यांवर आहे. त्यामुळे कर्जावरील व्याज दीर्घ काळासाठी उच्च राहण्याची शक्यता असून, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेट वाढवला जाईल. त्यामुळे साहजिकच कर्जे देखील महागणार असल्याचे संकेत मिळत आहे.
COMMENTS