Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात द्वितीय क्रमांक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने संपूर्ण देशाचे लक्ष

पोलिसांच्या माध्यमातून सदावर्ते यांची तीर्थयात्रा सुरू | LOK News 24
समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी कुठे थांबावे
कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर आता छवी मित्तल आली या आजाराच्या विळख्यात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला होता. या चित्ररथाला देशभरातून दुसर्‍या क्रमाकांचे पारितोषिक मिळाले आहे. तर उत्तराखंड राज्याचा पहिला तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे.

यावर्षी राज्यातील साडेतीन शक्तिपीठे तसेच स्त्री शक्तीचा जागर महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसून आले. त्याचबरोबर राज्यातील संस्कृती, पोतराज, वारकरी यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा या नारीशक्तीचे दर्शन संबंध देशवासियांना घरबसल्या पाहायला मिळाला. प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची बाजी मारली आहे. एकूण 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. यामध्ये साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान हा देखावा सादर करण्यात आला होता. चित्ररथांमधील दूसरा क्रमांक महाराष्ट्राला मिळाला आहे तर पहिला क्रमांक उत्तराखंडला, तर तिसरा युपीला मिळाला आहे.

COMMENTS