अकोले प्रतिनिधी ः समाजावर व धर्मावर होणारे आक्रमण थांबवण्यासाठी अध्यात्माचा अधिक प्रभावीपणे प्रचार करणे व गावोगावी होणार्या हरिनाम सप्ताहाना बळक
अकोले प्रतिनिधी ः समाजावर व धर्मावर होणारे आक्रमण थांबवण्यासाठी अध्यात्माचा अधिक प्रभावीपणे प्रचार करणे व गावोगावी होणार्या हरिनाम सप्ताहाना बळकटी देणे गरजेचे आहे, व हिंदुत्व स्वीकारताना हिंदू धर्माचा जागर करताना सर्वांनी सहभागी व्हावे म्हणजे आपल्या धर्माकडे वाकडया नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
ब्राह्मणवाडा(ता.अकोले) येथील दत्तवाडी येथील मूळ रहिवाशी व विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांच्या निवासस्थानी आयोजित हरिनाम सप्ताहा निमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व त्या वेळी ते बोलत होते. नगर जिल्हा हि अध्यत्माची भूमी असून अध्यत्माचा पर्यटन विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले. यावेळी बजरंग दलाचे प्रांत संयोजक विवेक कुलकर्णी,माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपा तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, जेष्ट नेते गिरजाजी जाधव, शिवाजी धुमाळ, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, अमृत सागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे,राजेंद्र देशमुख, अँड. अशोक गायकर, भगवान गायकर, सबाजी गायकर, देवराम पाबळे उपसरपंच सुभाष गायकर ,माजी जि. प.उपाध्यक्ष सिताराम देशमुख, राज गावांदे, निलेश गायकर,यांच्या सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
COMMENTS