Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीत घडली संतापजनक घटना

मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणी वर अत्याचार

कल्याण प्रतिनिधी - ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरून डोंबिवली पश्चिमेकडील खाडी किनारी येथे आपल्या मित्रा सोबत एक तरुणी फिरत होती. खाडी किनारी का

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयाचे नाणे लाँच करणार
प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक ः कोळेकर
इमारतीची लिफ्ट कोसळून एक जण ठार, तर तीन जण जखमी | LOKNews24

कल्याण प्रतिनिधी – ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरून डोंबिवली पश्चिमेकडील खाडी किनारी येथे आपल्या मित्रा सोबत एक तरुणी फिरत होती. खाडी किनारी काही वेळ घालविल्यानंतर ते दोघे परतत असताना समोरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी आपण पोलीस असून घरच्यांना या प्रकरणाची माहिती देणार असल्याची भीती घालत त्या तरुणीबरोबर असलेल्या तरुणाला त्यातील एका तरुणाने दुसरीकडे नेले यानंतर त्या नराधमाने त्या एकट्या मुलीला बाजूच्या झुडपात नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्या मुलाला सोडून आलेल्या दुसऱ्या नराधमाने देखील तिच्या शरीराचे लचके तोडले. कशीबशी जीव वाचवून ही तरुणी ठाकुर्ली स्थानकात पोचत असताना या नराधमांनी तिला पुन्हा गाठले आणि ठाकुर्ली रेल्वे यार्डातील सुनसान जागेचा फायदा घेत पुन्हा त्या तरुणीवर अतिप्रसंग केला. या अचानक झालेल्या घटनेमुळे तरुणीने रडत रडत ठाकुर्ली रेल्वे स्थानकात धाव घेत घडलेली घटना रेल्वे पोलिसांना सांगत मदत मागितली. रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तरुणीला धीर देत रेल्वे आरपीएफ च्या मदतीने तिला डोंबिवली विष्णूनगर पोलिसाकडे पाठवले. विष्णूनगर पोलिसांनी या तरुणीची तक्रार नोंदवून घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या नराधमाच्या शोधासाठी तीन वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. तसेच घटनेच्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच या नराधमांना अटक केली जाईल असे विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले.

COMMENTS