Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाइपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

  धुळे प्रतिनिधी - धुळे शहराला पाणीपुरवठा करणारे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन देवपूर येथील सुशीनाला पुलावर असलेले पाईपलाईन वॉल लेकीज झाल्याने ह

माई नावाचं वादळ झालं शांत
शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले
एसटी बस कंडक्टरच्या तिकिटाच्या पेटीची चोरी

  धुळे प्रतिनिधी – धुळे शहराला पाणीपुरवठा करणारे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन देवपूर येथील सुशीनाला पुलावर असलेले पाईपलाईन वॉल लेकीज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरासह शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे पाईप लाईन लिकिज असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.  हजारो लिटर वाया जाणारे पाण्याची बचत व्हावी या मागणी साठी अजहर पठाण (शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभाग धुळे) यांनी वारंवार धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी करूनही अद्याप शहरातील लिकिजेज बंद झालेले नाही. त्यामुळे सदर पाईपलाईन दुरुस्ती करणारे व लिकेज  काढणारे ठेकेदारांना विचारणा केली असता ठेकेदारांनी नकारार्थी उत्तर दिले आमचे बिल निघत नाही म्हणून आम्ही काम बंद ठेवले आहे. असे अजब उत्तर ठेकेदाराकडून मिळत आहे. धुळे महानगरपालिका झोपेतून कधी जागे होणार आणि वाया जाणार पाणी कधी थांबणार? असा प्रश्न धुळे शहर नागरिकांना पडला आहे. त्यामुळे धुळे महानगरपालिका आयुक्त गांभीर्याने लक्ष देतील का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

COMMENTS