मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

बंगळुरु/वृत्तसंस्था: कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री बदलाला वेग आला असून, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. तसे संकेत खु

लग्नाचा वाढदिवस नव्हे पश्चाताप दिन ! पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज
महावितरणच्या गुणवंत कर्मचाऱयांनी इतरांचे रोल मॉडेल व्हावे
23 रोजी नांदेड येथे  सर्वधर्मीय सामुहिकविवाह मेळावा 

बंगळुरु/वृत्तसंस्था: कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री बदलाला वेग आला असून, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. तसे संकेत खुद्द येडियुरप्पा यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केले. 25 जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केले. बीएस येडियुरप्पा यांनी बुधवारी रात्री ट्वीट करुन केंद्रीय नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा होती.

COMMENTS