Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार होत नसल्याने रुग्णांचे हाल

वर्धा प्रतिनिधी - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे .  साथ टी . टी . चे इंजक्शन सुध्दा प्रा

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
पीएफमध्ये मिळणार सरकारकडून घसघशीत भेट
ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

वर्धा प्रतिनिधी – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे .  साथ टी . टी . चे इंजक्शन सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळत नाही. अपघात झाल्यास बाहेरून टी . टी . चे इंजक्शन लिहुन दिले जाते व रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी मेडिकल मध्ये जाऊन पैसे देऊन टी.टी.चे इंजेक्शन आणावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा सध्या तालुका अधिकारी डॉ.विशाल रुहीकर यांच्याकडे चार्ज दिला आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.कांचन राऊत व डॉ.राजश्री गीरपुजे आहेत. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहिजे. तेवढा औषधी साठा उपलब्ध राहत नाही. टी.टी चे इंजेक्शन नाही तर अपघात झाल्यास रुग्णांवर उपचारासाठी लागणारे औषध कसे असतील? त्यामुळे गावातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा मिळत नाही.

COMMENTS