काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळेच माझी अपक्ष उमेदवारी – सत्यजित तांबे  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळेच माझी अपक्ष उमेदवारी – सत्यजित तांबे  

नंदुरबार प्रतिनिधी - नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून सर्वच उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचार करतांना दिसत आहेत. ना

महावितरण कंपनी खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव – नाना पटोले  
पवारांचे वक्तव्य, हरियाणातील घडामोडी समानार्थी !
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे ः विवेक कोल्हे

नंदुरबार प्रतिनिधी – नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून सर्वच उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचार करतांना दिसत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांच्या प्रचारसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृहात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सत्यजित तांबे यांनी बोलताना सांगितले की काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळेच मी अपक्ष उमेदवारी केली आहे. गेल्या वीस वर्षाच्या कार्यकाळात संघटनेच्या माध्यमातून आम्ही युवकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कुठेतरी मोठे व्यासपीठ मिळावे व आपले विचार मांडण्यासाठी व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक मतदान घेऊन निवडून येण्यासाठी नव्हे तर वडिलांचा वारसा व त्यांचे ऋणानुबंध पुढे सुरू ठेवण्यासाठीच लढत आहे. असे देखील सत्यजित तांबे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी अध्यक्षिय भाषणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की डॉ.सुधीर तांबे हे पदवीधर, शिक्षक यांच्यासाठी काम करणारा आमदार आहे. यापुढेही पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका झाल्या होत्या पण आमदार कोण निवडायचा हे कळायचे नाही. डॉ. सुधीर तांबे यांच्यामुळे पदवीधर मतदार संघाची निवडणूक व आमदार कोण आहे हे कळाले. शिक्षक पदवीधर व संस्थाचालक यांच्या प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य सत्यजित तांबे यांच्यामध्ये असल्याने त्यांना निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करा असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलताना सांगितले .यावेळी संख्येने शिक्षक पदवीधर मतदार व संस्थाचालक उपस्थित होते.

COMMENTS