Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील बेपत्ता तरुणीचा मृतदेह नीरा नदीत सापडला

पुणे ः पुण्यातील धनकवडी भागातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंडाळा परिसरात नदीत सापडला. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा

आठवडी बाजार भरू न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेतमाल उधळून लावला | LOKNews24
वाह ! क्या बात है , स्कीइंग १च नंबर | LokNews24
रेकॉर्डब्रेक पावसाने पुणेकरांची उडवली दैना

पुणे ः पुण्यातील धनकवडी भागातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंडाळा परिसरात नदीत सापडला. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहेत. नेहा शरद पिलाणे (वय 20, रा. जयनाथ चौक, धनकवडी, मूळ रा. वांगणी, ता. वेल्हे) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे नाव आहे.
नेहा 13 जानेवारी रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. नेहाचा मृतदेह 15 जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा परिसरातील नीरा नदीपात्रात सापडली. नदीत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ओळख पटवली. दरम्यान, नेहा बेपत्ता कशी झाली तसेच तिने आत्महत्या केली किंवा घातपात आहे का?, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.

COMMENTS