Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये महिला नायब तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

बीड/प्रतिनिधी ः बीड जिल्ह्यातील केज च्या महिला नायब तहसीलदारांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना भररस्त्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आह

विधानसभा अध्यक्षपदी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी शक्य
नगरच्या बालगृहातून अल्पवयीन मुलाचे झाले अपहरण…
बेपत्ता हेमंत सोरेन अखेर रांचीत दाखल

बीड/प्रतिनिधी ः बीड जिल्ह्यातील केज च्या महिला नायब तहसीलदारांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना भररस्त्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशा वाघ असे नायब तहसीलदाराचे नाव आहे. उच्च पदस्थ सरकारी अधिकार्‍यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे केज मध्ये खळबळ माजली आहे.
 कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून वाघ यांच्या भावानेच हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.  आशा वाघ या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ल्याची थरारक घटना घडली. आशा वाघ दुपारच्या सुमारास स्कूटीवरून तहसील कार्यालयाकडे जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना अडवले व त्यामधील एका महिलेसह अन्य चार जणांनी त्यांच्या हल्ला केला. पाच जणांनी बाटलीतून आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून हल्लेखोर फरार झाले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून आशा वाघ आणि त्यांच्या भावामध्ये जमिनीच्या वादातून संघर्ष सुरू आहे. आशा वाघ यांच्यावर कोणी हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामागे त्यांच्या भावाचा हात असल्याचे बोलले जात आहे. मात्र वाघ यांच्यावर यापूर्वी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मधुकर वाघ सध्या तुरुंगात आहेत. पण आजचा हल्ला त्याच्या  कुटुंबियांनी केल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS