Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

एअरटेलचे सर्वात स्वस्त प्लॅन्स

1 वर्षासाठी फ्री मिळतं हॉटस्टार अन् प्राइम

नवी दिल्लीः एअरटेलने यूजर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे वार्षिक प्लान आणले आहेत. परंतु, १७९९ रुपयाचा वार्षिक प्लान हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान

जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार : प्रतीक पाटील
ऊस वाहतुकीसाठी सीएनजी वापरावर भर देणार : डॉ. सुरेश भोसले
जपानचं मून मिशन ‘स्नायपर’ चंद्रावर उतरलं

नवी दिल्लीः एअरटेलने यूजर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे वार्षिक प्लान आणले आहेत. परंतु, १७९९ रुपयाचा वार्षिक प्लान हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान आहे. जर तुम्हाला वर्षभराच्या रिचार्जपासून सुटका हवी असेल तर तुम्ही एअरटेलचा हा प्लान रिचार्ज करू शकता. Airtel Annual Recharge प्लानमध्ये तुम्हाला ३६५ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा दिला जातो. एअरटेलच्या या प्लानमध्ये काय काय बेनिफिट्स दिले जातात, पाहा डिटेल्स. Airtel 1799 Plan एअरटेलचा हा वार्षिक प्लान १७९९ रुपये किंमतीत येतो. या प्लान अंतर्गत एकूण २४ जीबी डेटा पूर्ण वर्षभरासाठी ऑफर केला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड आणि नॅशनल कॉलिंगची सर्विस फ्री दिली जाते. हा प्लान त्या लोकांसाठी आहे. ज्यांना कमी डेटा लागतो. या प्लानमध्ये कॉलिंग आणि डेटा शिवाय, एअरटेलच्या १७९९ रुपये प्लानमध्ये ३६०० SMS करता येवू शकते. या प्लानमध्ये हॅलोट्यून्स आणि गाणे ऐकण्यासाठी विंक म्यूझिकचे सब्सक्रिप्शन दिले जाते. तसेच फास्टॅगवर १०० रुपयाचा कॅशबॅक दिला जातो. वर्षभर २४ जीबी डेटा दिला जातो.

Jio आणि Vi चा वार्षिक प्लान एअरटेल प्रमाणे वोडाफोन आयडिया आणि जिओ सुद्धा आपल्या यूजर्सला वार्षिक प्लान ऑफर करते. वोडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान १७९९ रुपयात येतो. याशिवाय, जिओचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान १५५९ रुपयात येतो. वोडाफोन आयडियाचा १७९९ रुपयाचा प्लान सुद्धा एअरटेलच्या एकूण २४ जीबी डेटा आणि व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. या दोन्ही प्लानमध्ये ३६५ दिवसाची वैधता दिली जाते. जिओचा १५५९ रुपयाच्या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. सोबत अनेक अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते.

COMMENTS