Homeताज्या बातम्याक्रीडा

न्यूझीलंडला ‘गिल’ वादळाचा तडाखा

शुभमनने ठोकले विक्रमी द्विशतक

हैदराबाद/वृत्तसंस्था ः भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात आघाडीचा फलंदाज शुभमन गिलने वादळी द्विशतक करत, अनेक विक्

कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने रचला इतिहास
पाकिस्तानच्या आशा जिवंत तर श्रीलंकेच्या संपुष्टात
राजस्थानचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माचं निधन

हैदराबाद/वृत्तसंस्था ः भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात आघाडीचा फलंदाज शुभमन गिलने वादळी द्विशतक करत, अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारून त्याने 200 धावांचा टप्पा गाठला. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज आहे. गिलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. 149 चेंडूत 208 धावा चोपल्या. या खेळीत 9 षटकार 19 चौकार मारले. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडेत न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत 50 षटकांत आठ गडी गमावून 349 धावा केल्या.

COMMENTS