नागपूर : भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शनिवारी खळबळ उडाली होती. आरोपींनी नितीन गडकर
नागपूर : भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शनिवारी खळबळ उडाली होती. आरोपींनी नितीन गडकरी यांच्या नागपुरमधील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा फोन करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची गंभीर दखल नागपूर पोलिसांनी घेतली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीचा छडा लावला आहे. आरोपी हा बेळगाव येथील तुरुंगात असून तो अट्टल आरोपी आहे.
धमकीवजा फोन करणार्याचे नाव जयेश कांथा असून तो बेळगाव येथील तुरुंगात एका खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. त्याने तुरुंगातूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल केले होते, असे पोलिसांनी सांगितले. नागपूरचे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमक्या दिल्या जात होत्या. फोन करणारा कुख्यात गुंड आणि खुनाचा आरोपी असून त्याचे नाव जयेश कंठा आहे. सध्या हा आरोपी कर्नाटकच्या बेळगाव येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृहात बेकायदेशीरपणे फोन वापरून गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकावले. आरोपीची ओळख पटली असून पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाने आरोपींकडून एक डायरी देखील जप्त केली आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या रिमांडची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी आरोपीने तीन वेळा फोन आले होते. गडकरी यांच्याकडे 100 कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर पोलिसी दलात खळबळ माजली होती. तपासाची चक्रे फिरल्यानंतर समजले की, हा फोन बेळगावमधून आला होता. दरम्यान, या घटनेमुळे नागपूर पोलिसांनी नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ केली होती.
COMMENTS