Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीसाठी 100 कोटींची तरतूद

मुंबई : कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वारकर्‍यांना मिळणार विमा संरक्षण
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करणार

मुंबई : कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ही समिती मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश देतानाच समितीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार मकरंद पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते तर आमदार पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या समितीच्या मार्फत कोयना भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येणार्‍या आठ तालुक्यांच्या दुर्गम भागात वसलेल्या गावांच्या विकासासाठी भूकंप पिडितांना अर्थसहाय्य देण्यात येते. समितीमार्फत सन 2022-23 मध्ये विकासकामांसाठी प्रस्तावित 30 कोटी रुपये यावेळी मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर महाजेनकोने मार्च पर्यंत 35 कोटी रुपये देण्याचा निर्णय यावेळी झाला. ही समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येत असून ती मदत व पुनर्वसन विभागास हस्तांतरीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता देतानाच समितीसाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश दिले.

COMMENTS