नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई (बॉम्बे), कर्नाटक, गुजरात आणि मणिपूर या उच्च न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या नावांची शिफारस क
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई (बॉम्बे), कर्नाटक, गुजरात आणि मणिपूर या उच्च न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली आहे. या संदर्भात काल कॉलेजियमची बैठक पार पडली. या बैठकीत कॉलेजियमने सात न्यायिक अधिकारी आणि दोन वकिलांना विविध उच्च न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये वकील नीला गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सध्या 65 न्यायाधीश असून मंजूर न्यायाधीशांची संख्या 94 इतकी आहे.
नीला गोखले यांनी याआधी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये वकील म्हणून काम केले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या वकील म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. नीला गोखले यांच्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून वकील नागेंद्र नाईक, रामचंद्र दत्तात्रेय हड्डर आणि वेंकटेश नाईक थावरयानाईक यांच्या नावाची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोनदा केंद्र सरकारने नाईक यांच्या नावावर आक्षेप घेत फाइल परत पाठवली होती. यावेळी कॉलेजियमच्या बैठकीत तिसर्यांदा नागेंद्र नाईक यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय या यादीत न्यायिक अधिकारी मृदुल कुमार कलिता यांना गुवाहाटी उच्च न्यायालयात, न्यायिक अधिकारी पी. व्यंकट ज्योतिर्मय आणि व्ही. गोपालकृष्ण राव यांना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात, तसेच दोन न्यायिक अधिकारी अरिबम गुणेश्वर शर्मा आणि गोलमेई गैफुलशिलू काबुई यांची मणिपूर उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची कॉलेजियमने शिफारस केली होती.
COMMENTS