Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार सलग दुसर्‍या दिवशी कोसळला

मुंबई : आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी (10जानेवारी) भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 676 अंशांच्या घसरणीसह 60,07

Ahmednagar : महाराष्ट्रातील शाळा व कॉलेज त्वरित सुरू करण्यात यावे
मनोज जरांगेंची नेवाशात लवकरच घोंगडी बैठक
संगमनेमध्ये राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी (10जानेवारी) भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 676 अंशांच्या घसरणीसह 60,0700 पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी 203 अंशानी घसरून 17,897 च्या पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 24 समभागांमध्ये घसरण झाली. त्याचवेळी उर्वरित केवळ 6 समभागांमध्ये तेजी दिसून येत आहे. टीसीएसने काल आपले तिमाही निकाल जाहीर केले. यात तिमाही नफ्यात वार्षिक 10.98 टक्के दराने 10,883 कोटींचा नफा नोंदवण्यात आला. बाजार विश्‍लेषकांच्या मते हा नफा कमी झाला असून तो अंदाजे 11,247 कोटींच्या घरात असणे आवश्यक होते. जागतिक बाजारपेठेत डाऊ जोन्समध्ये अंदाजे 83 अंशांची अथवा 0.25 टक्क्यांची घसरण झाली. तर एस अँड पी 500 इंडेक्स 40 अंशांनी घसरला. युरोपिअन बाजारपेठेतही आज सुरुवात घसरणीने झाली. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला.

COMMENTS