Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण मधील प्रेम संबंधातून झालेल्या हत्येतील आरोपींना २४ तासात अटक

कल्याण प्रतिनिधी - कल्याण मधील खडे गोलवली परिसरात 7 जानेवारी रोजी 19 वर्षीय आदित्य सुरेश वर याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या प्रेम संबंधात

जवायाने केली सासूची निर्घृण हत्या
अर्बन बँकेच्या सोनेतारणात घोळ… ३० पिशव्यांमध्ये सापडले बेन्टेक्सचे दागिनेl पहा LokNews24
शाहरुख खानची चाहत्यांना वाढदिवसानिमित्त भेट, ‘डंकी’चा शानदार टीझर रिलीज

कल्याण प्रतिनिधी – कल्याण मधील खडे गोलवली परिसरात 7 जानेवारी रोजी 19 वर्षीय आदित्य सुरेश वर याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या प्रेम संबंधातून झाली होती. यातील आरोपी ललित उज्जैनकर ,सागर,रोहित आणि नकुल यांच्या विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आदित्य यांचे एका तरुणींसोबत प्रेम संबंध होते त्याच तरुणीचे यापूर्वी ललित सोबत प्रेम संबंध होते. मात्र प्रेयसीने त्याला सोडल्याच्या रागातून ललित ने त्यांच्या मित्रानं सोबत ही धारधार शस्त्राने हत्या केली. यात चार जणांन विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील आरोपी नकुल याला तात्काळ कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सुनील गवळी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे, सहायक पोलिस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार हनुमंत शिर्के प्रमोद जाधव सचिन कदम मिलिंद बोरसे यांनी तीन आरोपींना मध्य प्रदेश मधील बुराहानपुर नेपानगर येथून ताब्यात घेतले. तसेच यासर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता , ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

COMMENTS