Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आगामी पाच दिवस थंडीचे

मराठवाडा, विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद

नवी दिल्ली/मुंंबई ः राज्यात सोमवारपासून पुन्हा एकदा तापमानात मोठी घट बघायला मिळत असून, आगामी काही तासांमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, ना

हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स ; महाराष्ट्र युवक काँग्रेसचा पुढाकार
कुरघोडी करण्याऱ्या चीनला खडसावले
यड्रावकर यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना आक्रमक | LokNews24

नवी दिल्ली/मुंंबई ः राज्यात सोमवारपासून पुन्हा एकदा तापमानात मोठी घट बघायला मिळत असून, आगामी काही तासांमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भतील काही भागात थंडीची लाट शक्यता आहे.

सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी होणार आहे. तसेच सध्या वार्‍याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत चक्री वारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील. तर उर्वरित महाराष्ट्रात तापमान कमी होईल, असे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवत असल्याचे दिसून येत आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंडगार वार्‍यांमुळे थंडी परतली आहे. गारठवणार्‍या थंडीमुळे परत शेकोट्या पेटल्या आहे. विदर्भातील तापमानात सरासरी 2 अंशाने घट झाल्याने थंडीने गारठून गेले आहे. मात्र ही थंडी 31 जानेवारीपर्यत राहील. त्या नंतर पूर्वेकडून तसेच दक्षिण-पूर्वेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे थंडी कमी होत जाईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले. पार्‍यात कमालीची घसरण झाल्यामुळे विदर्भ गारठला आहे. विदर्भात सरासरी 2 अंशाने पारा घसरल्याने थंडीने उसळी मारली आहे. थंडी वाढल्याने स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे, जर्कीन घातल्याशिवाय लोक बाहेर निघत नाहीत. सायंकाळी 5 नंतर अंधारायला होते आणि थंडीमुळे गारठायला होते. बोचर्‍या वार्‍यांमुळे दिवसा ऊन असले तरी गारठायला होते. विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या 24 तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उपराजधानी नागपुरात आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून गोंदियात सर्वाधिक कमी 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.

उत्तर भारतात धुक्यामुळे 260 रेल्वेगाडया रद्द – उत्तर भारतात धुक्याने कहर केला असून दाट धुक्यामुळे दिल्लीत सोमवारी (दि.9) अनेक ठिकाणी दृश्यता शून्यावर आली होती. दुपारनंतर वातावरणात काहीशी सुधारणा झाली. धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून तब्बल 260 गाड्या रेल्वेला रद्द कराव्या लागल्या आहेत. केवळ दिल्लीच नाही, तर पंजाब, राजस्थान, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश याठिकाणी कडाक्याची थंडी व धुक्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ज्या 260 रेल्वे गाड्या सोमवारी रद्द कराव्या लागल्या, त्यात 82 एक्सप्रेस, 140 पॅसेंजर गाड्या तर 40 उपनगरीय गाड्यांचा समावेश होता.

COMMENTS