Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

164 महाविद्यालयांना मिळणार अनुदान

पुणे ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुणे, अहमदनगर, नाशिक, दादरा हवेली येथील

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात
पाणीपट्टी व करवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन
‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल’ : नाना पटोले | LOKNews24

पुणे ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुणे, अहमदनगर, नाशिक, दादरा हवेली येथील 164 महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ’गुणवत्ता सुधार योजना’ सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. याबाबत माहिती देताना अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, अशा प्रकारे निधी उपलब्ध करून देणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. मागील वर्षी देखील विद्यापीठाकडून दोन कोटीहून अधिक निधीचे वितरण करण्यात आले होते. अधिक माहिती देताना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ज्या महाविद्यालयांनी अर्ज केले होते त्यापैकी 164 महाविद्यालये या योजनेसाठी पात्र ठरली असून त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी पुणे शहर येथील 49, पुणे ग्रामीण येथील 16, नाशिक येथून 19, अहमदनगर येथून 15, दाद्रा हवेली येथील 1 अशा शंभर महाविद्यालयांचा समावेश आहे. यांच्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. 

COMMENTS