नवी दिल्ली ः दिल्लीतील कांझावाला ’हिट अँड रन’ प्रकरणात अंजलीच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी
नवी दिल्ली ः दिल्लीतील कांझावाला ’हिट अँड रन’ प्रकरणात अंजलीच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार पोलिसांनी हा दावा केला आहे. तर या अहवालात तिच्यावर बलात्कार झालेला नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, अंजलीची मैत्रीण निधीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, अपघातात कारस्वारांची चूक होती. मात्र, अजंली देखील नशेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेची प्रत्यदर्शी असलेल्या निधीने हा दावा केला आहे. पोलिस जबाबात निधी म्हणाली की, मी स्कूटी चालवू का अशी विनंती तिने अंजलीला केली होती. पण तिने मला स्कूटी चालवायला दिली नाही. त्यानंतर काही वेळाने कारची धडक झाली. तेव्हा मी एका बाजूला फेकले गेले. ती गाडीखाली अडकली. त्यानंतर कारने तिला फरफटत नेले. मला हे सर्व पाहून भीती वाटली म्हणून मी तेथून पळ काढला आणि कोणालाही काही सांगितले नाही. त्याचवेळी आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, स्कूटी रस्त्यावर स्थिर चालत नव्हती. अशातच हा अपघात झाला. दरम्यान, पोलिस दोन्ही बाजूंची तपासणी करीत आहेत. दिल्लीचे विशेष आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) एसपी हुड्डा यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टममध्ये अंजलीच्या डोक्याला, मणक्याला आणि डाव्या बाजूला जखमा झाल्या होता. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू अखेरच तिचा मृत्यू झाला. रिपोर्टमध्ये कुठेही बलात्काराची पुष्टी नाही. यापूर्वी, पीडिता तिची मैत्रिण निधीसोबत स्कूटीवर होती. असा खुलासा पोलिसांनी केला होता. धडकेनंतर मृत तरूणी कारमध्ये अडकली आणि 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्या गेली. तर त्यापूर्वी पोलिसांनी 4 किमी फरफटत नेल्याचा दावा केला होता. अपघातानंतर स्कूटीवर असलेली दुसरी तरुणी घटनास्थळावरून पळून गेली. तिलाही किरकोळ दुखापत झाल्याची सांगितले गेले.
COMMENTS