Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका

गृहखात्याने दिले सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत गृह विभागाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्य

नगर शहरात आशा टॉकीज चौकात खुलेआम अवैधरित्या शस्त्रांची विक्री
मंत्री भुजबळांच्या बेनामी संपत्तीच्या तक्रारी रद्द
थिएटरबाहेर फुटला बॉम्ब; सनी देओलचा ‘गदर 2’ पहायला गेलेले प्रेक्षक थोडक्यात बचावले

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत गृह विभागाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संभाजी महाराजाबद्दलच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. यात बोलताना आव्हाडांनी ऐतिहासिक दाखले देत अजित पवारांवर टीका करणार्‍यांवर निशाणा साधला. सध्याची राजकीय स्थिती पाहता आव्हाडांच्या जीवाला धोका असल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

संभाजी राजेंच्या नाजूक इतिहासात जाऊ नका नाही तर, मोठा वाद निर्माण होईल. सावरकर आणि गोळवलकर यांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड याबाबत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, स्वराज्य रक्षक म्हणजे धर्माचे रक्षण होईलच ना, जे हरहर महादेव चित्रपटाचे समर्थन करताय, जेम्स लेनला ज्यांनी पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला संभाजी महाराज, शिवाजी महाराजांविषयी शिकवू नये. आधी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे दाखवले गेल. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनाही शिवाजी महाराजांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला गेला. जे अजित पवारांच्या विरोधात बोलताय त्यांनी सांगावे की, गोळवलकरांचा आम्ही धिक्कार करतो. त्यांचे पुस्तक जाळून टाकतो. त्यावर बंदी आणतो. मग तुम्हाला जे बोलायच ते बोला. असे आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दौर्‍यावेळी त्यांना सुरक्षा वाढ करण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे ‘धर्मवीर’ नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते असे विधान केले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने तात्काळ आक्षेप घेत आंदोलने केले होते. छत्रपती संभाजीराजे यांनी े पत्रकार परिषद घेत हे वक्तव्य केले. दरम्यान, दुसरीकडे अजित पवारांविरोधात भाजपने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज स्वराजरक्षक आहेत. हे निश्‍चित आहे. त्यांनी धर्माचे रक्षण केले हे कोणी नाकारू शकत नाही. मी वेळोवेळी ऐतिहासिक कार्यक्रम असेल तेव्हा माझ्या भाषणाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांचे नाव घेताना स्वराज्यरक्षक, धर्मवीर असे संबोधले आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, माझी सर्व पुढार्‍यांना विनंती आहे की, इतिहासाच्या बाबतीत तुम्ही आत्ताच्या काळात राहताना जे काही विधान करता ते अत्यंत चुकीचे आहे. इतिहासकारांनी जे काही मांडलेले आहे त्याचे आपण आत्मचिंतन करावे.

COMMENTS