Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यात वावगे नाही – शरद पवार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सध्या छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर यावरुन वाद सुरु असून, भाजपसह शिंदे गट अजित पवारांविरोधात आंदोलने करता

ओबीसींचे संख्याबळ आणि जागृती डावलणारे वक्तव्य !
सैन्यातील 34 महिला अधिकार्‍यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
मनीष सिसोदियांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सध्या छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर यावरुन वाद सुरु असून, भाजपसह शिंदे गट अजित पवारांविरोधात आंदोलने करतांना दिसून येत आहे. यावर मंगळवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले असून, छत्रपती संभाजीराजेंना ’धर्मवीर म्हणा की, स्वराज्यरक्षक म्हणा. दोन्ही बिरुदावलीला वावगे नाही. धर्माच्या अँगलने म्हणाल तरीही हे ज्याचे त्याचे मत आहे. त्यावर आक्षेप नसावा. अशी स्पष्टोक्त पवार यांनी मुंबईत दिली. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर की, स्वराज्यरक्षक म्हणावे यावरील वादावर त्यांनी पडदा टाकण्याचा आज पत्रकार परिषदेत प्रयत्न केला.

विधानभवनात अधिवेशनादम्यान अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक म्हणणे उचित ठरेल असे वक्तव्य केले होते. या व्यक्तव्यानंतर राज्यात भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी अजित पवारांचा निषेध केला. त्यानंतर या प्रकरणावर शरद पवारांनी आपली भुमिका जाहीर केली. शरद पवार म्हणाले, धर्मरक्षक याबाबतची जी काही तक्रार आहे की, त्याबद्दल मला थोडीसी काळजी वाटते. कारण ठाणे येथे जातो त्यावेळी धर्मवीर म्हणून काही नेत्यांचे नावे ऐकू येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळचे आमचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? संभाजी महाराजांवर जी आस्था आहे त्यानुसार ज्यांनी त्यांनी बोलावे. संभाजी महाराजांच्या महत्वाच्या कामाची नोंद घेतली ती महत्वाची आहे. राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी एक महत्वाचे काम केले, त्यामुळे त्यांना बिरुदावली लावली त्यात वावगे नसल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS